अजून मराठी टायपींग शिकतोय!!
शुध्द मराठी लिहणे आणि बॊलणे यात बराच फरक आहे.
मराठी मध्ये ब्लॉग करण्यासाठी अजून मराठी टायपींग शिकतोय.
याहू!!!!
टाईगर सफ़ारी
![]()
टाईगर सफ़ारी हा ब्लॉग मी लिहण्याचॆ कारण म्हणजे वाघ हा माझा आवड्ता प्राणी आहे. फोटोग्राफ़ीची आवड आणि विशय जर वाघ असेल तर मजा काही वेगळीच असते. भारता मध्ये सरकारने व्याघ्र प्रक्लप केले आहेत. ह्याचे कारण म्हणजे भारता मध्ये कमी होणारी वाघांची संख्या. हे व्याघ्र प्रक्लप असलेली काही ठीकाणे आहेत जीम कार्रबेट नैशनल पार्क, रणथंभोर नैशनल पार्क, बांधवगड नैशनल पार्क, पेंच व ताडोबा व्याघ्र प्रक्लप. आज भारता मध्ये जवळ पास ३,५०० ते ४,५०० वाघ आहेत. वाघांची होणारी हत्या ह्यामुळे हा प्राणी दुर्मिळ होत चालला आहे. असो.
कुठल्याही जंगलात फोटोग्राफ़ी करताना जंगलाची व जंगली जनावरांची माहिती असणे आवश्यक असते. वाघा संबधी सांगायचे झाले तर वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे. साधारण वाघाचे आयुष्य १२ ते १५ वर्षाचे असते. एक वाघीण ३ ते ४ वर्षांची झाल्यावर छाव्याना जन्म देते. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात मी राजस्थान मध्ये रणथंभोरला जायचे ठरविले. संध्याकळी मुंबई वरून जयपूर एक्स्प्रेसनी मी दुस-या दिवशी सवाईमाधवपूर्ला स्टेशन वर उतरलो. राजस्थानच्या कडक उन्हाळ्याची जाणीव स्टेशनवर उतरताच जाणीवली. हॉटेल वर पोहचल्यावर फ्रेश: व जेवण झाल्यावर दुपारी ३ वाजता सफारीला निघालो. उन्हाळ्यात सफारीची वेळ सकाळी ६ ते ९.३० व दुपारी ३ ते ६.३० अशी आहे.
रणथंभोर चे जंगल ५ झोन मध्ये विभागले आहे. दुपारच्या सफरीला मला ३ नंबरचा झोन देण्यात आला. दर सफारीला वेगळा झोन मिळतो. ३ नंबर झोनची सफारी सुरू झाली. कॅमेरा सज्ज होताच. कुठ्ल्या वेळी कुठ्ला प्राणी व पक्शी दिसेल ह्याचा नेम नसतो. सत्तत प्रत्येक ठिकाणी सावध असणे गरजेचे असते. कधीही सफारी मध्ये जास्त बोलू नये. ह्याचे कारण असे की आवाज आला की ही जनावरे सावध होतात. कारण आपण त्यांच्या राज्यामध्ये असतो. झोन ३ मध्ये माझ्या सफारी गाईड ला झुड्पांनमध्ये हालचाल जाणीवली. गाईड्ची नजर अचूक होती. तिथे एक ५ वर्षांचा वाघ होता. बस मग जी काय स्पर्धा त्याला पाहण्या सुरू झाली ती विचारू नका. सगळ्यांचे कॅमेरे त्याच्या दिशेने रोखले गेले. वाघ झुड्पात असल्याने त्याचा फोटो काढ्णे कठिण होते. तो जो पयर्तं उठ्त नाही तो पयर्तं तीथे थांबणे गरजेचे होते. आम्ही सगळे वाट बघत बसलो. जवळ जवळ ४५ मिनटांनी तो झुड्पातून बाहेर आला. त्याची नजर व चालण्याची स्टाईल बघण्यासारखी हॊती. भराभर मीही त्याचे फोटो काढ्ले. एखद्या मॉडेल प्रमाणे तो फोटो काढण्यासाठी पोज देतोय असे वाटत होते. पहिल्या सफारी मध्ये चांगले फोटो मला काढ्ता आले. वाघाच्या बर्याच पोजेस फोटो मध्ये मिळाल्या होत्या. अशा अजून दोन सफारी मी दूसर-या दिवशी केल्या आणि वाघाचे फोटो ही काढ्ले. दूसर-या दिवशीची मजा होती ती म्हणजे टी १७ वाघीण. टी १७ ही दोन वर्शाची आहे. तीला सुंदरी म्हणून ही ओळखले जाते.
रणथंभोरच्या जंगलात वाघ सोडून ही बर्याच गोश्टी बघण्या सारख्या आहेत.
फॊटोची लींक : http://picasaweb.google.com/hemantphanse/Ranthambhore01#